जेव्हा मुश्रीफांच्या नातूनांही शाळेत जाऊ देत नाही; या कारवाईमागे राजकीय खेळी ?

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 26 July 2019
  • भाजप प्रवेश नाकारला म्हणुन छापा 
  • या कारवाईमागे भाजपची राजकीय खेळी 
  • कागलकर मुश्रीफांच्या पाठीशी

कोल्हापूर : आयकर विभागाची टीमने 25 जुलैच्या पहाटे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा मारला. एकाचवेळी 7 ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या तसेच टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरीदेखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या गाडीची सुद्धा यावेळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.

मुश्रीफांच्या घरातील लहाणग्यांना म्हणजेच त्यांच्या नातूनां घराबाहेरही पडू दिलं नाही. यामुळे त्यांना शाळेतही जाता नाही आलं. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या परिवारास नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. 

कागलकरांचे मुश्रीफ प्रेम

या कारवाईची माहिती वाऱ्यासारखी कागलसह जिल्ह्यात पसरताच कागलमधील कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी गर्दी केली. महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाबरोबरच श्री. मुश्रीफ यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. काही महिलांनी त्यांच्या घरासमोर ठाण मांडले. काही काळासाठी कागलमधील व्यवहारही बंद होते.

भाजप प्रवेश नाकारला म्हणुन छापा 

भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजप मधे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी ते सपशेल फेटाळून लावत प्राण असेपर्यंत शरद पवार यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मुश्रीफ यांच्या या निष्ठेमुळेच त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून भयभीत करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News