मायणीच्या शाळेत भरली मुनिया पक्ष्यांची शाळा 

अंकुश चव्हाण
Monday, 29 July 2019

 विद्यार्थ्यांना मिळतंय भूतदयेचे सहज शिक्षण 
 

कलेढोण (जि. सातारा)  : ऋषिमुनीप्रमाणे दाढी- मिशा वाढवून छोटा चिमणीसारखा दिसणाऱ्या मुनियांनी (पक्ष्यांनी) मायणीतील शाळा गजबजलेल्या आहेत. हे पक्षी पाहून शालेय मुले पक्षी निरीक्षणाचा व माध्यान्ह भोजनातून मिळणाऱ्या खाद्यामुळे भूतदयेची शिकवण त्यांच्या अंगी रुजत आहे. हे पक्षी सौंदर्य पाहण्यात मायणीतील भारतमाता विद्यालय, वत्सलाबाई गुदगे कन्या व इंग्लिश मीडियमची मुले रममान होत आहेत. मायणी (ता. खटाव) परिसराला पक्षी आश्रयस्थानाचा वारसा आहे. 

आजवर बालभारतीनेही येथील पक्षी सौंदर्याची विशेषत: फ्लेमिंगोची दखल घेतली आहे. गेल्या वर्षी बदलेल्या अभ्यासक्रमात सहावीच्या परिसर अभ्यासात मायणी आश्रयस्थानाचा समावेश केला आहे. मायणी परिसरातील ब्रिटिशकालीन मायणी, कानकात्रे तलाव व 65 हेक्‍टर वनसंपदेत विविध प्रकारचे जीवजंतू, कीटक, कृमी, सरपटणारे प्राणी व पक्षी आढळतात. त्यातच आढळणारा ठिपकेदार मुनिया दहा सेंटीमीटर आकारमानाचा चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. जुलै ते ऑक्‍टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून, त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपली घरटे बांधताना दिसत आहेत.

 मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची चार ते आठ अंडी देते. येथील भारतमाता विद्यालय व वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला व इंग्लिश मीडियम परिसरातील अशोकाच्या झाडांवर, छोट्या झुडपात या पक्ष्यांची घरे आढळून येत आहेत. त्यांचे निरीक्षण करण्यात शालेय विद्यार्थी दिसत आहेत. ऋषिमुनीप्रमाणे वाढलेली दाढी- मिशा, गळ्याभोवती लालरंग, अंगावरील काळे- पांढरे ठिपके आणि "पटी! पटी!' असा आवाजाने हे पक्षी शालेय परिसराची शोभा वाढवीत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षणाची गोडी व भूतदया हे गुण सहजअंगी रुजत आहेत. 

दुपारच्या सुटीत ही पाखरे पाहण्यासाठी मुले घोळका करून असतात. मुलांना या पाखरांचे कुतूहल वाटते. मुले त्यांना खाऊ टाकतात. 
- संगीता घाडगे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News