मुंबई पालिका मुख्यालयातच टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • चार महिन्यांपासून पालिका मुख्यालयालाच रोज दोन ते तीन टॅंकरने पाणी पुरवले जात आहे.
  • नगरसेविका सुजाता सानप यांनीही या विभागात अपुरा वाठीपुरवठा होत असल्याची तक्रार केली होती.

मुंबई -  नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देणाऱ्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयालाच तीन-चार महिन्यांपासून टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याचे बुधवारी उघड झाले. या इमारतीत टॅंकरने दररोज २५ ते ३५ हजार लिटर पाणी पुरवले जाते. 

शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आह. अनेक ठिकाणी अपुरे पाणी येत असल्याची तक्रार नगरसेवक आणि नागरिकांनी केल्यास तांत्रिक कारण किंवा अपुऱ्या पावसाची सबब देत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला पालिकेकडून दिला जात होता. मात्र, चार महिन्यांपासून पालिका मुख्यालयालाच रोज दोन ते तीन टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. पालिकेच्या मुख्यालयात तीन हजार कर्मचारी काम करतात तर रोज एक हजारहून अधिक लोक कामानिमित्त येतात.

ही इमारत असलेल्या पालिकेच्या ‘अ’ विभागात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. शिवसेना नगरसेविका सुजाता सानप यांनीही या विभागात अपुरा वाठीपुरवठा होत असल्याची तक्रार केली होती. पालिका सभागृहातही या मुद्‌द्‌यावर आवज उठवण्यात आला होता. या मुद्‌द्‌यावर भाजपच्या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी ‘अ’ विभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता; मात्र,तांत्रिक कारणामुळे पाणी कमी येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात होता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News