मुंबईतील महापालीकेचा अजब दावा, मुंबईत फक्त ४१४ च खड्डे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

मुंबईकरांनो तुमच्या महापालिकेने असा काही दावा केला आहे की त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मुंबई महापालिकेच्या मते मुंबईत फक्त ४१४ च खड्डे आहेत. सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या MCGM या अॅपवर १० जूनपासून खड्ड्यांबाबत सुमारे २६४८ तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची माहिती घेऊन २३३४ खड्डे बुजवण्यात आले. म्हणजेच तब्बल ८४% तक्रारींचे निवारण केले गेले, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे; मात्र विरोधी पक्ष नेते तसेच कार्यकर्त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

मुंबई महापालिकेने यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती न पुरवल्याने त्यांनी केलेला दावा कितपत खरा आहे, हे पाहणं गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News