मुंबईच्या काळजाचा ठोका चुकला आणि ‘२६ जुलै’ची आठवण झाली!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • धुवाधार पावसाने ‘२६ जुलै’ची आठवण; वाहतुकीचा बोऱ्या

मुंबई - मुंबईत शुक्रवार सकाळपासूनच पावसाचा मारा सुरू होता. त्यात सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने एका तपापूर्वीच्या ‘२६ जुलै’ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. ठाणे, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले.

मुंबईत शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. आकाशात काळे ढग दाटून राहिल्यामुळे अत्यंत कमी वेळ सूर्यदर्शन झाले. अधूनमधून सरी कोसळत होत्या; मात्र काही वेळातच पाऊस उसंत घेत होता. शुक्रवारची सकाळच वाहतूक कोंडीने उजाडली. विक्रोळी-जोगेश्‍वरी मार्गावर विक्रोळी गांधीनगर येथील उड्डाणपुलावर अवजड वाहन 

रायगडसाठी तीन दिवस धोक्‍याचे 
मुंबई वगळता महामुंबईतील काही भागांत रविवारी (ता. २८) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यातील काही भागांत पुढील तीन दिवस २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत पुढील तीन दिवस १०० मिमीपर्यंत पाऊस होईल. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा मारा कायम राहील आणि रविवारी अतिवृष्टी होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

येथे अडकली मुंबई 

 परळ ते माटुंगा, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्ग. 
 वाडीबंदर, पी. डिमेलो मार्ग. 

 कामराजनगर, चेंबूर. 
 कुर्ला ते घाटकोपर, लालबहादूर शास्त्री मार्ग. 
 जोगेश्‍वरी ते कांदिवली, पश्‍चिम द्रुतगती मार्ग. 

  वाशी खाडीपूल. 
जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड
विक्रमी वाहतूक कोंडी 

प्रवासाला नेहमीपेक्षा 
१५१ टक्के जास्त वेळ.

एक तासाच्या अंतरासाठी अडीच तास.
वाहतूक वळवली - हिंदमाता, गांधी मार्केट (किंग्ज सर्कल), नॅशनल कॉलेज (वांद्रे), अंधेरी सबवे, वीरा देसाई रोड (अंधेरी), मोतीलाल नगर गोरेगाव). 

शुक्रवारी रात्रीपर्यंत...
 शहर - ५७.२२ मिमी 
 पश्‍चिम उपनगर - ६५.९६ मिमी
 पूर्व उपनगर - ८८.३६ मिमी

सर्वाधिक पाऊस 
 भांडुप - १४८ मिमी 
 विक्रोळी - ११० मिमी 
 अंधेरी पश्‍चिम - १२० मिमी 
 विलेपार्ले - ११५ मिमी 
 मरोळ - ११४ मिमी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News