होडीतला फोटो ट्विट करत अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019
  • अमिताभ बच्चन यांनी महागरपालिकेवरच ओढले ताशेरे

  • ट्विट करत घेतली पालिकेची फिरकी!

मुंबई - चार दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुबंई झाली आहे.  बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान स्वतः अमिताभ यांनी मुंबईच्या पावसावर एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवांशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत.

 

बच्चन यांनी त्यांच्या सिनेमातील एक फोटो शेअर केला. यात त्यंच्यासोबत झिनत अमानही आहेत. यात ते एका होडीत बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘दादा, जरा गोरेगावला न्या’. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला. दरम्यान, पावसानं तूर्तास जरी उसंत घेतली असली तरीही हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News