मुंबई-पुणे रेल्वेचा फटका, प्रवाशांना झटका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019
  • मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक मंगळवारीही विस्कळीत झाली
  • चेन्नई एक्सप्रेस, मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस लोणावळ्यातुन रद्द
  • त्यामुळे लोणाबळा एसटी स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी

लोणावळा: मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक मंगळवारीही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. चेन्नई एक्सप्रेस, मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस लोणावळ्यातुन रद्द करण्यात आली. जयंती जनता कन्याकुमारी एक्सप्रेस तळेगाव स्थानकातून पुण्याकडे रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे लोणाबळा एसटी स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी केली होती. 

कर्जत ते लोणावळा दरम्यान बोरघाटात जामरुंग जवळ मालगाडीचे सोळा डब्बे सोमवारी रुळावरून घसरली होती. यामुळे रेल्वे रुळांची मोठी हानी झाली आहे. रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानच्या अनेक गाड्या रेल्वे प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आल्या असून रेल्वेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News