मुंबईत मुली स्कार्फ का नाही बांधत?

सोनल महादेव मंडलिक
Tuesday, 29 January 2019

मुंबई : स्कार्फ म्हणजे मुलींच्या अगदी जिवाभावाचा विषय...स्टाइल आणि उन्हापासून संरक्षण व्हावं या उद्देशाने मुली स्कार्फ वापरतात असं समजते. लहान-मोठ्या आकारात आणि वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये मिळणाऱ्या स्कार्फ्सना मुलींकडून पसंती मिळतेय. वेगवेगळ्या स्टाईलचे स्कार्फ बांधण्याचा सध्या ट्रेंड आहे. मेट्रो सिटीमध्ये स्कार्फ हा फॅशनचा भाग आहे. पुण्यासारख्या शहरात तर विनास्कार्फ मुलगी दिसणं म्हणजे आश्चर्यच..! मात्र मुंबईमध्ये सहसा मुली स्कार्फ बांधताना कमी दिसतात. त्यामागे नेमकी काय कारणे असू शकतील जाणून घेऊयात.  

नेमकी काय आहेत कारणं ?

  • मुंबईतील मुली त्यांच्या सौंदर्यबाबत जास्त कॉन्फिडन्ट फील करतात. 
  • कदाचित स्कार्फखाली त्यांचे सौंदर्य झाकून ठेवणे त्यांना आवडत नसावं. 
  • आजकाल सर्वच मुली घराबाहेर पडताना मेकअप करूनच बाहेर पडतात. वेगवेगळी हेअरस्टाईल करतात. स्कार्फ बांधल्याने मेकअप किंवा हेअरस्टाईल खराब होण्याची शक्यता असते. 
  • इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील मुली बिनधास्त आहेत. आपण मित्र किंवा बॉयफ्रेंड सोबत असलो तरी त्यांना लोक काय म्हणतील याबाबत त्या बेफिकीर असतात. 
  • आपण कसे दिसतो याबाबत मुली सर्वाधिक विचार करत असल्याने स्कार्फ सूट होत असेल तरच तो वापरणं मुली पसंत  करतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News