पावसामुळे मुंबईला मिळाला ८३ दिवस पुरेल इतका पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • मुंबईला ८३ दिवस पुरेल इतका पाणीसाठा 
  • सामान्य मुंबईकर सुखावला 

मुंबई : मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने विश्रांती घेत रिपरिप सुरू केली असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावांत तीन लाख २९० दशलक्ष लिटर साठा उपलब्ध झाला आहे. तो मुंबईला ८३ दिवस पुरेल, असे सांगण्यात येते. 

मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. पाऊस सुरू होण्यापूर्वी तलावांत केवळ ७१ हजार १७ दशलक्ष लिटर साठा होता. मुंबईला सध्या दिवसाला तीन हजार ६५० दशलक्ष लिटर पाणी आवश्‍यक आहे. सध्याचा साठा पुढील ८३ दिवस पुरेल.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
  धरण : साठा
  भातसा : १,१२,०५८
  विहार : १२,२२७
  तुळशी : ६,४९६
  मोडक सागर : ६०,७७३
  तानसा : ४९,०४४
  मध्य वैतरणा : ६२,६९१

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News