मुंबईत तीन वर्षांचा मुलगा नाल्यात पडला, घटना सीसीटीव्हीत कैद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • या मुलाचे नाव दिव्यांश असून बुधवारी रात्री ११.२४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
  • यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, दिव्यांशचा शोध घेतला जातो आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु असताना मुंबईतील नाले अधिक धोकादायक बनले आहेत. मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर अशीच एक घटना समोर आली आहे. येथील इटालियन कंपनीजवळ एक तीन वर्षांचा मुलगा नाल्यात पडला आहे. ही  घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाल्याचे झाकण उघडे असल्याने हा मुलगा त्यात पडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

या मुलाचे नाव दिव्यांश असून बुधवारी रात्री ११.२४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, दिव्यांशचा शोध घेतला जातो आहे.  या घटनेला १० तास होऊन गेले तरी अद्याप मुलाचा शोध लागला नाही. 

 

गटारांची झाकणे उघडे असल्याने यापूर्वी देखील मुंबईत असे अनेक प्रकार घडले आहेत. याबाबत कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News