मुलायमसिंह रुग्णालयात : उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • मेदांता हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री दाखल करण्यात आले
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली​

गुडगाव : समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांना सोमवारी रात्री येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्‍त्याने दिली. लखनौहून येथे दाखल झालेल्या मुलायमसिंह यांना येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आजारी असलेल्या मुलायमसिंह यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर नियमित तपासणीसाठी मुलायम यांना रविवारी लखनौतील राम मनोहर लोहिया मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांनी त्यांना घरी सोडण्यात आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News