मुक्ता दिसणार नव्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

मुक्ता बर्वे म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर मुक्ताचा गोंडस, हसरा चेहरा उभा राहतो. मुक्ताला आजवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे.

मुक्ता बर्वे म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर मुक्ताचा गोंडस, हसरा चेहरा उभा राहतो. मुक्ताला आजवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे.

मात्र ‘बंदिशाळा’ चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे. या चित्रपटात ती महिला तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मुक्ताची रुबाबदार भूमिका पाहून प्रेक्षक भारावले होते.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही पार पडला. मिलिंद लेले दिग्दर्शित या चित्रपटात महिला सुरक्षेच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यात आला आहे. या चित्रपटातील गाणी वैशाली सामंत, अमितराज यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी गायली आहेत. शांताई मोशन पिक्‍चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुक्ताबरोबरच शरद पोंक्षे, विक्रम गायकवाड, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, प्रवीण तरडे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News