शेजार धर्म म्हणून किती ते उसण घ्यायचं...

निलिमा क्षत्रिय
Thursday, 13 June 2019

अगदी आतापर्यंत शेजारपाजारी उसनं मागणं चालायचं, ह्या उसण्यात काहीही असायचं. दोन कांदे, बटाटे मिरच्या, चहा, साखर, पिठ अगदी जेवणात आवडती भाजी नाही म्हणून पोरगं भूनभून करत असलं की 'जा,शेजारच्या पाटील बाईंकडून घेऊन ये भाजी,' असं सर्रास चालायचं.

अगदी आतापर्यंत शेजारपाजारी उसनं मागणं चालायचं, ह्या उसण्यात काहीही असायचं. दोन कांदे, बटाटे मिरच्या, चहा, साखर, पिठ अगदी जेवणात आवडती भाजी नाही म्हणून पोरगं भूनभून करत असलं की 'जा,शेजारच्या पाटील बाईंकडून घेऊन ये भाजी,' असं सर्रास चालायचं. मागणारी आणि देणारी दोघींनाही त्यात काही विशेष वाटायचं नाही. पापड, शेवया करायला बायका एकमेकींकडे हौशीने जायच्या. ग्रामीण भागात अजूनही जातात...

गँदरिंग असलं की मुली, ठराविक रंगांच्या साड्या, ओढण्या, अमक्या रंगाच्या बांगड्या, तमक्या रंगाची माळ, गंगावणं मागून न्यायच्या माझ्याकडे हिरवी आणि केशरी ओढणी होती. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला त्यांना फार डिमांड असायची.. 
डांन्सला हिरव्या रंगाची साडी ठरवली की चार जणींकडे हिरवी साडी असायची तर दोन जणींकडे नसायची..मग त्या दोघींना लाल साड्या नेसवून पुढे नाहीतर आजूबाजूला उभं करायचं. बरंच डोकं चालवत चालवत मुलं कार्यक्रम बसवायची. 

आता कोणी कोणाकडे काही मागत नाही... गँदरिंगचं तर सगळं सामान सेटच्या स्वरूपातच मिळतं आता सगळी मुलं एका साच्यातून काढल्यासारखी, मुख्य म्हणजे गँदरिंग म्हणजे डान्स बसवणे एवढंच झालंय. नाटिका ,नाट्यछटा, साभिनय उतारा पाठांतर हे सगळ लुप्तच झालंय. डान्स सुद्धा स्वत: न बसवता कोरिओग्राफर नावाची जी एक जमात उदयाला आली आहे, त्यांच्याकडूनच बसवून घेतात, स्वत:ची क्रिएटीव्हिटी कुठे वापरायचीच नाही. सगळं स्वत:करण्यात काय आनंद असतो, ते स्वत:ला लागणारं सामान स्वत: जमवण्यात काय मजा असते, अँडजेस्टमेंट काय असते, ते ह्या मुलांना कधी कळणारही नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News