मृत्यूंजयातील कर्ण आणि मी

तुलेश्वरी बालपांडे, ब्रम्हपुरी
Thursday, 31 January 2019

आज सहज "मृत्युंजय" कादंबरी वाचत असताना काही बाबी मनाला भिडून गेल्या, रडवूनही गेल्या, काही स्वतःवर बितलेल्या वास्तविकतेशी समरस वाटल्या, म्हणून त्यावर लिहिलेलं काही

कधीही न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगताना किती कुंठित होत असेल मन? ही  मनामध्ये दबलेली अगतिकता कुणाजवळ मांडायची? ज्यांचं ऊत्तरच नाही असे प्रश्न विचारतात समाजातील काही निरूत्तरीत लोक, ज्या प्रश्नांचे बोचरे शब्द कधीकधी तलवारीच्या वारासारखे वाटतात आणि भिडतात देखील मनाला. व्यतीत होतंय मन सदानकदा, शोध घेतय, अशा काही गोष्टींचा ज्यात नेमकी घोडचूक कोणाची होती, त्या निरामय मनाची कि कुणीही सदानकदा घाव घालावे अशा देहाची.

स्वतःचा कमीपणा घालविण्यासाठी साजीश करणारे गुन्हेगार धुळवटीसारखे मोकळे सुटतात. एवढंच काय तर त्यांनाच राजाश्रयही मिळातो, त्यांचीच स्तुतीही होते? खरोखरंच खूप चांगलं वागणं, समजदार राहणं, भावना समजून घेणारं असणं, सुंदर दिसणं, अष्टांगपैलू व्यक्तिमत्व म्हणून चमकनं, त्यासोबतच प्रतिभावान असणं हे गुण विकारी वृत्तीच्या लोकांसाठी शाप आहेत. तरीही अशी प्रघल्भ बूध्दीवान माणसं त्या विषारी वृत्तीच्या लोकांना जवळ करतातच, तेही ते विकृतवृत्तीचे आहेत हे माहित असूनसुध्दा. 

सांगून गेला आहे इतिहास तो महाभारताचा! हे महारथी "कर्ण", तू जन्माने सूतपुत्र असलास तरी, कर्माने तू खरा पुरुषार्थ दाखवून दिलेला आहेस. अशा महाभारतातील कर्णाची विरता अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ होती, हे जगजाहीर होतच; पण न्याय अर्जुनालाच मिळाला. अखेर सर्व श्रेष्ठ अशा महान कुशल पुरुषाचा सदानकदा छळ आणि अखेर पतनच झालं. महाकाव्यातही याचं वर्णन आहे. महामहिम भीष्माला जीवनातील प्रत्येक क्षणात आणि अखेर बाणांच्या शय्येवरही असताना पश्चतापाने ग्रासलं होत कि, आपण योग्य वेळी न्याय दिला असता तर आज कुरुवंशाचा नाश होण्याची वेळ आली नसती. यावरून हेच सिद्ध होतंय कि, चांगल्या व्यक्तीच्या कलागुणांना वाव दिला नाही तर, त्याचं पतन होतंय आणि "पतन" अखेर विनाशाला कारणीभूत ठरत असते!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News