मृणाल करणार मुलाच्या कथेचं दिग्दर्शन 

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 January 2019

मृणाल कुलकर्णीने ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. आता पुन्हा ‘ती ॲण्ड ती’ हा मराठी चित्रपट ती दिग्दर्शित करतेय. याचं लेखन मृणालचा लेक म्हणजेच विराजस करतोय. लेखक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट.

आईनेच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी लेखन करणं ही त्याच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. तो म्हणतो, ‘लेखक म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. याची कथा मी पहिल्यांदा चित्रपटाचा निर्माता पुष्कर जोगला दाखवली. आम्ही दोघांनी कथेवर नीट अभ्यास केला आणि नंतरच ही कथा मी आईला दाखवण्याची हिंमत केली.’ विराजसने लेखक म्हणून केलेला पहिला प्रयत्न सफल ठरणार का, हे पाहायचंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News