करिना पुन्हा झळकणार ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट' सोबत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

आधी ‘३ इडियट्‌स’ आणि ‘तलाश’ सारख्या चित्रपटांत ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. आता पुन्हा ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. 

‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अभिनेता आमिर खानने त्याच्या ५४ व्या वाढदिवसाला हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक बनवण्याची घोषणा केली होती.

या हिंदी रिमेकचे नाव ‘लाल सिंग चढ्ढा’ असे असणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे समोर आले नव्हते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर खानच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यावेळी करिना इतर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने तिने या चित्रपटाला होकार कळवला नव्हता. मात्र, आता करिनाने या चित्रपटासाठी होकार कळवल्याचे समोर आले आहेत. म्हणजेच करिना आमिरसोबत झळकणार असल्याचे नक्की झाले.

या आधी ‘३ इडियट्‌स’ आणि ‘तलाश’ सारख्या चित्रपटांत ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. आता पुन्हा ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News