खासदार महास्वामींच्या दर्शनावेळी भाविकांचे मोबाईल गायब!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 

अनिकेत मडवळप्पा तानवडे (वय 51, रा. दक्षिण कसबा, सोलापूर. सध्या- विष्णूलक्ष्मी, पवना नगर, चिंचवड, पुणे) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. 

तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील 15 हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम शंकरराव यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे. 

- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News