पाणी प्रश्नावरुन खा. उदयनराजें संतापले; राष्ट्रवादीला राजेंचा घराचा आहेर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • उदयनराजे भोसले यांचे खडे बोल
  • राष्ट्रवादीला घराचा आहेर

  • .१४ वर्षात अध्यादेश का काढला नाही?​ राजेंचा सवाल

सातारा : नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नीरा डाव्या कालव्याचा वाद वाढल्यानंतर राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले होते. जलसंपदा खात्याने अध्यादेश काढल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली होती.

मात्र, उदयन राजे चांगलेच संतापले आहेत. १४ वर्षात अध्यादेश का काढला नाही? असा सवालही उदयनराजेंनी केला आहे. नीरा देवघर पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला घराचा आहेर दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली आहे. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्‍यानंतर महाजन यांनी बारामतीचे पाणी वळविण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, बारामतीचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आल्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News