खासदार संजय राऊत थेट लिलावती रुग्णालयातून लिहतात की...
- सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय.
मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आहे खासदार संजय राऊत यांचा. संजय राऊत यांचे दररोज पोस्ट होणारे ट्विट, त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा, बहुमताची जमवाजमव करण्यासाठी केलेली धडपड अवघा महाराष्ट्र बघत आला. पण आज व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे आश्चर्याच्या सगळ्या सीमाच पार केल्या आहेत.
आज सकाळी लीलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी झालेले संजय राऊत चक्क सामनासाठी संपादकीय लिहिताना दिसले. काल शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही हिंमत न हारता त्यांनी आज संपादकीय लिहिले. त्यांच्यातला सच्चा पत्रकार जागा झाला व त्यांनी उठून कामाला सुरवात केली. एवढेच नाही, तर आज सकाळी सव्वानऊच्या दरम्यान त्यांनी ट्विट केले.
"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।'
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे...— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2019