चलती ट्रान्सपरंट टॉपची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

सध्या तरुणी फॅशनेबल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्या फॅशनेबल कपडेही घालतात.

सध्या तरुणी फॅशनेबल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्या फॅशनेबल कपडेही घालतात. मग ते एखाद्या तरुणीने दुसऱ्या तरुणीच्या अंगावर घातलेले पाहिले की, तिलाही तसे कपडे घालण्याची आवड निर्माण होते. मग तिची ती आवड तिच्या लूकला सूट करो अथवा ना करो, ती तरुणी ते कपडे घालते.

सध्या बदलत्या फॅशननुसार लोकही बदलत असतात. तेही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे त्या त्या ऋतूमधले कपडे घालतात.
पहिले अन्न-वस्त्र-निवारा या लोकांच्या गरजा मानल्या जात असत, मात्र आता बदलत्या ऋतूनुसार बदलणे ही गरज आहे. आता बाजारात चलती आहे ती चायना जीन्स व त्यांवर वेअर केलेल्या ट्रान्सपरंट टॉपची. या टॉपमधून इनर घातले जाते. ही फॅशन सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी आहे.

या टॉपचा फायदा उन्हाळ्यात व पावसाळ्यात खूप होतो.हे टॉप उन्हाळ्यात घातले की गरम होत नाही व पावसाळ्यात घातले की लवकर सुकतात. त्या जीन्स व टॉपवर तरुणी डिझाइनर लॉकेट वेअर करतात. हातात प्रिंटेड बांगड्या व कानामध्ये मोठ्या साइजचे कानातले सिल्व्हर किंवा गोल्डमध्ये घालतात. या टॉपमध्ये निळा, गुलाबी, पांढरा, काळा अशा रंगांना जास्त मागणी आहे. पण एक मात्र खरं, बदलत्या काळानुसार आपले राहणीमान बदलत राहावे, ही चांगली सवय आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News