मानुषी छिल्लर करणार 'या' अभिनेत्यासोबत चित्रपट

सागर गायकवाड (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

विश्वसुंदरीचे किताब पटकवणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर चंदेरी दुनियात पाऊल ठेवणार ही चर्चा तर सगळीकडे आहे.  दोन वर्षेआधी मिस वर्ल्ड झालेलीमानुषी छिल्लर सज्ज झाली आहे.

विश्वसुंदरीचे किताब पटकवणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर चंदेरी दुनियात पाऊल ठेवणार ही चर्चा तर सगळीकडे आहे.  दोन वर्षेआधी मिस वर्ल्ड झालेलीमानुषी छिल्लर सज्ज झाली आहे.

ती एक चित्रपट करणार आहे, ही चर्चा खुप पसरत आहे, पण या चर्चेचा आता शेवट होणार आहे. असे समजले जाते की, मानुषी ही फराहच्या आगामी चित्रपटात दिसून येईल.

मानुषी ही अभिनेता अक्षय कुमारसोबत एका बायोपिक चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या चित्रपटात काम करण्यासाठी खुप उत्सुक आहे.

माहितीनुसार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर हे शूरवीर पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारीत बायोपिकमध्ये एकत्र काम करणार आहेत.

याच वर्षी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. पृथ्वीराज चौहानचा हा चित्रपट चंद्रप्रकाश द्धिवेदी डायरेक्ट करणार आहे.या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करणार आहे.

मानुषी छिल्लर या चित्रपटात राजकुमारी संयुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.

काही दिवसांपुर्वी मानुषी तिच्या ग्रॅंड लॉंन्चच्या तयारीमध्ये व्यस्त होती. ती अभिनय आणि डान्स शिकत आहे.

सोबत चित्रपटाची तयारी देखील करत आहे. एक वेगळी प्रेमकथा चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

मानुषी छिल्लर हिने वर्ल्डचा किताब पटकवण्याआधी हरियाणामध्ये ५४ वी फेमिना मिस वर्ल्ड २०१७ चा किताब पटकावला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News