चित्रपटात सनी लियोनीने त्याचा मोबाईल नंबर सांगितला आणि त्याचं जगणच कठीण झालं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

रोहित जुगराज दिग्दर्शित दलजीत दोसांज, क्रिती सेनन, वरुण शर्मा यांच्यासोबत सनी लियोनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अर्जुन पटियाला' या चित्रपटामुळे एका तरुणाचं जगणं कठिण झालं आहे.

हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता, चित्रपटातील एका सीनमध्ये सनी लियोनी एक मोबाईल नंबर बोलते. चित्रपट प्रदर्षित झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की चित्रपटामध्ये सनीने सांगितलेला मोबाईल नंबर हा खोटा नसून तो नंबर दिल्लीतील एका तरुणाचा आहे.

'अर्जुन पटियाला' या चित्रपटात एका सिनमध्ये सनी लियोनीने जो मोबाईल नंबर सांगितला आहे, त्या नंबरवर बऱ्याच प्रमाणात लोकांनी फोन केल्याचं समजलं. तसेच हा नंबर चित्रपटातील सनी लियोनीचा नसून तो दिल्लीत स्थायिक असणाऱ्या एका पुनीत अग्रवाल नावाच्या तरुणाचा आहे. सध्याची परिस्तिथी अशी आहे की, पुनीतच्या फोनवर दररोज शंभर ते सव्वाशे फोन येत असतात, त्यामुळे त्या तरुणाकडे स्वत:चा मोबाईल नंबर बंद केल्याखेरीज कोणताच पर्याय उरला नाही. 

पुनीतला २६ जुलैपासून या नंबरवर फोन येण्यास सुरुवात झाली आहे. त्याला विचारल्यास तो सांगतो की, फोन करणारा प्रत्येक व्यक्ती मला सनी लियोनीबद्दल विचार पूस करतात. तसेच सनी लियोनी सोबत बोलणं करून द्या, असंही सांगितलं जातं, अशी माहिती पुनीतने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News