'हा' चित्रपट पूजा हेगडेसाठी लकी ठरला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही रमलेली अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. ती ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा हिंदी चित्रपटांकडे वळली आहे. तिच्या हाती बिग बजेट साऊथ चित्रपटही आहेत.

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही रमलेली अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. ती ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा हिंदी चित्रपटांकडे वळली आहे. तिच्या हाती बिग बजेट साऊथ चित्रपटही आहेत. पूजा सध्या ‘वाल्मिकी’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. खरं तर हा चित्रपट पूजासाठी लकी ठरला आहे.

हॉलीवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट रिचर्डसनने या चित्रपटाचा काही भाग चित्रित केला आहे. रॉबर्ट यांच्या नावे बरेच नावाजलेले पुरस्कार आहेत. पूजा म्हणते, ‘रॉबर्ट यांची मी फॅन आहे. त्यांच्याबरोबरच काम करणं हे माझं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे.’

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News