या आमदारांने केले हुतात्मा करकरे यांच्या वेशभूषेत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आंदोलन केले. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या निषेधार्थ आज विधानभवनात हुतात्मा हेमंत करकरे यांच्या वेशभूषेत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी युती सरकारचे लक्ष वेधले.

मालेगाव येथे सुमारे दहा वर्षांपूर्वीच्या या बाँबस्फोटात सहा जण ठार, तर जवळपास शंभर जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास शहीद हेमंत करकरे यांच्याकडे होता व ते प्रामाणिकपणे यांचा तपास करीत होते. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख व वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत करकरे २६/११च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी चकमकीत हुतात्मा झाले होते.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News