बुरखा बंदीच्या हालचालींना महाराष्ट्रात वेग? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019

श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून भारतातही बुरख्यावरून राजकारण सुरू झालं आहे. चेहरा झाकणं किंवा बुरखा घालणं यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा एक लेख 'सामना' मध्ये प्रसिद्ध झाला होता. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी करून महाराष्ट्रात बुरखा बंदीची हालचालींना वेग आणण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्याचे दिसते.  

श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून भारतातही बुरख्यावरून राजकारण सुरू झालं आहे. चेहरा झाकणं किंवा बुरखा घालणं यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा एक लेख 'सामना' मध्ये प्रसिद्ध झाला होता. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी करून महाराष्ट्रात बुरखा बंदीची हालचालींना वेग आणण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्याचे दिसते.  

श्रीलंकेने राष्ट्रीय सुरक्षितेसाठी मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घातली. तिथल्या बहुसंख्य उलेमांनी तसेच मौलवींनी राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय असल्याने या बंदीला पाठिंबा दर्शिविला आहे, मात्र भारतात यावर हिंदुत्ववादी पक्षांकडून राजकारण होताना दिसत आहे. शिवसेनेने सामनाच्या लेखात असे म्हण्टले होते की, बुरख्यामुळे सुरक्षा तपासणीमध्ये अडचणी येतात, सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला ओळखू शकत नाहीत. याचा दहशतवादी फायदा उठवतात. त्यामुळे बुरखा घालू नये असे म्हण्टले होते. 
या मागणीनंतर त्यांच्यावर देशभरातून टीका आणि येणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ती भूमिका शिवसेनेची नाही तरी सामनाची आहे म्हणून हात झटकले. 

शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनीही 'सामना'च्या अग्रलेखातील भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. नीलम गोऱ्हे यांनी ही भूमिका मांडताच संजय राऊत यांनी ट्विट करून अग्रलेखाचं समर्थन केलं होतं. यानंतर याला साध्वी प्रज्ञासिंह यांनीही समर्थन दिलं. मात्र शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपने शिवसेनेच्या बुरखा बंदीला विरोध केला आहे. त्यामुळे देशभरात बुरख्याचा हा वाद चांगलाच गाजतोय. 

हिंदु मतपेटीवरील सुटलेली पत मिळवण्यासाठी प्रयत्न - फारुक अहमद (सुराज्य सेना)

बुरखा या मुद्यावर सामना मध्ये मांडण्यात आलेली भुमीका म्हणजे हिंदु मतपेटीवरील सुटलेली पत परत मिळवण्यासाठी केलेले केवीलवाणी प्रयत्न होते. परंतु हिंदु समाज सुध्दा असल्या विकृत विचारांना भीख घालत नाही. हे लक्षात येताच शिवसेने दोन पाऊल मागे जाऊन ही भुमीका शिवसेनेची नाही असे स्पष्ट केले. 

भारतातील राजकारण हे मुलभूत मुद्यापासुन भटकायला हवे व धर्मांध / जातीयवादी विषयांपर्यंत कसे अडकुन ठेवुन मतांचे ध्रुवीकरण करता येईल हे प्रयत्न सेना-भाजप तर करत असतेच, पण या मुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादी सारख्या तथाकथीत पक्षांना सुध्दा सेक्युलरीज्मच्या नावाखाली सेना-भाजपची भीती दाखवून कसल्याही अजेंड्याशिवाय सेक्युलर वोटबॅंकेवर कब्जा मिळवतात. म्हणुन हे दोघेही घटक एकाच वर्गात मोडतात. 

अश्या भंपकबाजींवर लक्ष देण्याऐवजी मुस्लिम सहीत सर्व संविधानवादी समाज घटकांनी सध्या सर्व वंचीत घटकांना सत्तेत त्यांचा वाटा मिळवुन देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजीक क्रांतीच्या लढ्यात सहभागी होऊन परिवर्तनवादी क्रांतीमध्ये सहभागी व्हायला हवे

निवडणुकीत हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न - पैगंबर शेख (सामाजिक कार्यकर्ते पुणे)

सध्या जो बुरख्याचा मुद्दा उठवला गेला आहे. त्यामागे पुढील ३ टप्प्याच्या निवडणुकीत हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करून राजकिय लाभ घेण्याचा स्पष्ट हेतू सत्ताधाऱ्यांचा दिसत आहे. आणि त्यामुळेच ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. बुरख्यावर बोलल्यावर मुस्लीम त्याचा विरोध करतील आणि त्यामुळेच हिंदू समाजासमोर मुस्लीम समाज सुधारणावादी नाही ही प्रतिमा आणखीन भडक केली जाईल आणि मतांच्या ध्रुवीकरणाचा हेतू साध्य केला जाईल. त्यामुळे नोटबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आपोआप बाजूला पडतील.

कालच गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला झाला. नक्षलवादी साधारणपणे सिक्युरिटी गार्ड सारखे कपडे घालतात आता सत्ताधारी त्याप्रकारच्या कपड्यांवर बंदी घालणार का?

कोणी काय घालावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला महिलांनी साडी, कुर्ता पायजामा, जीन्स, मिनी स्कर्ट आणि बुरखा घातलेलाही आवडत नाही. कारण आपण आपल्या नजरेतून त्यांना पाहत असतो. मुळात महिलांनी कुठले वस्त्र परिधान करायचे आहेत हे महिलांनी ठरवायला हवे. नाकी पुरुषांनी. बहुतांश पुरुषांनाचा महिलांनी काय परिधान करावे आणि काय नाही यात स्वारस्य असते. पण महिला, पुरुषांनी कुठले वस्त्र परिधान करावे किंवा कुठले नाही, यावर नाही व्यक्त होतात, ना त्या पुरुषांच्या कुठल्याही पोशाखावर बंदी घाला किंवा नकाच परिधान करू असे म्हणतात. स्त्रीकडे आपण वस्तू म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून पाहिले पाहीजेल.

शेवटी हा मुद्दा गांभीर्याने जरी घेतला तरीही मुस्लीम महिला बुरखा न घातल्याने आतांकवाद कमी होईल असा खोटा विचार करणे किंवा तशीच समाजाची मानसिकता राजकीय हेतूने बनवणे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून स्वतःचा नाकर्तेपणा आणि अपयश झाकल्यासारखे होईल. असो, तरीही देश सुरक्षित हाथो मे है असं म्हणायला सत्ताधारी कमी करणार आहेत का ?

केरळमधील मुस्लिम कॉलेजात बुरखाबंदी

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील कालिकत येथे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत (एमईएस) चालवल्या जाणाऱ्या शाळा व कॉलेजांत ही बुरखाबंदी घालण्यात आली आहे. तसे पत्रकच संस्थेने १७ एप्रिलला जारी केले आहे. संस्थेच्या सर्व शाळा आणि कॉलेजांच्या परिसरात बुरखा परिधान करण्यास बंदी असून, महिलांनी चेहरा झाकेल असा वेश परिधान करू नये, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अर्थातच, केरळमधील अनेक संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. 

यांनी बुरखा बंदीला केला विरोध 

असदुद्दीन ओवेसी :
शिवसेनेच्या बुरखाबंदीच्या मागणीला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 'निवडीचा अधिकार' हा राज्यघटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही हिंदुत्व सर्वांवर थोपवू शकत नाही. उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल,' असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. 

जावेद अख्तर :
बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे, अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि पुरोगामी विचारवंत जावेद अख्तर यांनी मांडली आहे.

रामदास आठवले :
बुरख्यावर बंदी घालण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. आपल्या देशात बुरख्यावर अशा पद्धतीने बंदी घालता येणार नाही. बुरखा हा मुस्लीमधर्मीयांच्या परंपरेचा एक भाग आहे, अशी टिप्पणी रामदास आठवलेंनी केली. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News