लातूरच्या गिर्यारोहकाने सर केले माउंट एल्ब्रुस

सुशांत सांगवे
Saturday, 6 July 2019
  • सर्वांत उंच शिखरावर‍ फडकावला भारताचा ध्वज; विविध राज्यातील १० गिर्यारोहकांचा समावेश

लातूर: युरोपातील सर्वांत उंच मानल्या जाणाऱ्या, ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मिटर आहे, अशा शिखरावर लातूरचा युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने आणि त्यांच्या दहा जणांच्या संघाने भारताचा ध्वज फडकवून शनिवारी (ता. ६) कौतूकास्पद कामगिरी केली. हा माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय असा क्षण आहे, अशा भावना दीपकने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे भारताचा सर्वांत मोठा ध्वज दीपकने फडकवला होता. त्यानंतर आता युरोपमधील माउंट एल्ब्रुस शिखर त्याने सर केले आहे. त्याच्यासोबत या मोहिमेत विविध राज्यातील १० गिर्यारोहकांचा समावेश होता. महाराष्ट्रातून दीपक हा एकमेव होता. ही मोहिम पूर्ण झाल्यानंतर दीपकने ‘सकाळ’शी संवादही साधला.

माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रीस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत असते. याबाबचे योग्य ते प्रशिक्षण तो २९ जुन रोजी भारतातून रवाना झाला होता. त्यानंतर १ जुलैपासून शिखरावर चढाई करण्यास सुरवात झाली. ही मोहिम शनिवारी (ता. ६) सकाळी पूर्ण झाली. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंघावणारे झोत अशा वातावरणात आम्ही सहा दिवस काढले. वातावरण सतत बदलत होते, तरी आम्ही मोहिम पूर्ण केली. माझ्यासोबत तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश अशा राज्यातील गीर्यारोहक होते. विशेष म्हणजे दोन मुलींचाही या मोहिमेत समावेश होता. त्यापैकी एका मुलीने हे शिखर सर केले, असे अनुभव दीपकने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News