दिव्यांग विद्यार्थ्यांकडून शाळेतील मुलांना मिळाली प्रेरणा...

सकाळ वृत्तसेवा (यीनबझ)
Friday, 16 August 2019
  • अंबरनाथ मधील नॅब आय.डी. बी. आय. सेंटर ला भेट देउन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
  • 'आपल्याला दृष्टी असुन आपण कामाला कंटाळा करतो. ही मुले बाहेरील जग पाहू शकत नाही तरी जिद्दीने काम करतात'.

कल्याण: कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालय या शाळेतील इ. नववी च्या विद्यार्थ्यांनी अंबरनाथ येथील शासन मान्य नॅब आय. डी. बी .आय पॉलिटिकल सेंटर ला भेट देउन 
रक्षाबंधन साजरा केला . कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालय मार्फत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम करत असतांना नेहमीच प्रेरणादायी शिक्षण देत आहे. अंबरनाथ मधील नॅब आय.डी. बी. आय. सेंटर ला भेट देउन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

'राख्या बांधुन आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तेथील मुलांशी हितगुज केली. आमच्या शाळेची मुले तेथील वातावरण पाहून भारावून गेल्याची' माहिती मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली. दृष्टी नसतांना मोठमोठाली मशिन हाताळून फाईल मेकींग, प्लास्टिक मोल्डिंग, लोखंडाला छिद्रे पाडणे अशा विविध वस्तू तयार केल्या जातात.

विद्यार्थी तिथेच शिकतात आणि शिकल्यावर मशिन हाताळू लागतात. त्यांना मानधन दिला जातो. प्रथमेश कदम हा विद्यार्थी बोलला,'आपल्याला दृष्टी असुन आपण कामाला कंटाळा करतो. ही मुले बाहेरील जग पाहू शकत नाही तरी जिद्दीने काम करतात'. आपणही काम करायला हवे असे म्हणत तो भावनिक होऊन त्याने संस्थेला शंभर रुपये मदत केली.

मदतीच्या रुपात काही विद्यार्थ्यांनी तेथिल वस्तू खरेदी केल्या. आपल्या आजूबाजूला जर अंध व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी भ्रमणध्वनी 9029104251 या नंबर वरती संपर्क करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करा असेही आव्हान केले. सेंटर चे प्रमुख आणि उपसंचालक उमेश देशपांडे, यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शेखर तडकर व अधीक्षक यांनी मुले मशिन वर काम कसे करतात हे प्रात्यक्षिक रूपात दाखवले.

तेथील विद्यार्थी अशिक पाटिल याने बहीण भावाचा ऋणानुबंधचा सण 'रक्षाबंधन' हे गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. शाळेतील शिक्षिकांनी तेथील कर्मचारी वर्गाला राख्या बांधल्या. शाळेचे गणेश पाटील, नयना वाबळे, संगीत पाटील आणि शोभा देशमुख हे शिक्षक उपस्थित होते सेंटर वरील सर्व सहकाऱ्याचे आभार मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी मानले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News