वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • दुसऱ्या फेरीसाठी २ लाख ९३ हजार जागा
  • अकरावी प्रवेशासाठी एकूण १ लाख ८५ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या फेरीत ६१ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने १ लाख २३ हजार ८३२ विद्यार्थ्यांसाठी तब्बल २ लाख ९३ हजार ४७२ जागा उपलब्ध होणार आहेत.​

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. प्रवेश देण्यात आलेल्यांपैकी केवळ ६१ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी २ लाख ९३ हजार ४७२ जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक जागा असून, त्याखालोखाल विज्ञान व कला शाखेच्या जागांचा समावेश आहे. 

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत १६ जुलैला संपली. या यादीमध्ये १ लाख ३४ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता; परंतु पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने ७२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेशाकडे पाठ फिरवल्याने दुसऱ्या फेरीसाठी २ लाख ९३ हजार ४७२ जागा उपलब्ध आहेत. 
अकरावी प्रवेशासाठी एकूण १ लाख ८५ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या फेरीत ६१ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने १ लाख २३ हजार ८३२ विद्यार्थ्यांसाठी तब्बल २ लाख ९३ हजार ४७२ जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्‍यता आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News