जाणून घ्या, 10 लाख बोली लागलेल्या बोकडाची कहाणी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • दरवर्षी ईद या सणाला बोकडांची किंमत लाखोंच्या घरात असते. गेल्याच वर्षी बोकडावर ५ लाखांची बोली लावली गेली होती मात्र यावर्षी चक्क मालकाने १० लाख रुपयांची बोली बोकडावर लावली. बोकडांना ईदच्या वेळेला खूप डिमांड असतो. अकोल्यापासून ते विदर्भातील अनेक जिल्ह्यामधून बोकडांना खूप मागणी आहे. 

दरवर्षी ईद या सणाला बोकडांची किंमत लाखोंच्या घरात असते. गेल्याच वर्षी बोकडावर ५ लाखांची बोली लावली गेली होती मात्र यावर्षी चक्क मालकाने १० लाख रुपयांची बोली बोकडावर लावली. बोकडांना ईदच्या वेळेला खूप डिमांड असतो. अकोल्यापासून ते विदर्भातील अनेक जिल्ह्यामधून बोकडांना खूप मागणी आहे. 

अकोल्यामध्ये बकरी ईदला बोकड कापण्याची प्रथा आहे. मुस्लीम धर्मामध्ये बोकडांच्या कुर्बानीला खूप महत्व असते. असाच एक अकोल्यामधील बाळापूर तालुक्यातील 'तामशीचे बोकड' हा सध्या मुस्लिम बांधवांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्यासाठी हा बोकड तर सेलेब्रिटी बनला आहे. त्यांनी ह्या बोकडाला 'चाँद' असं नावं दिल आहे. 

गणेश काळे नावाच्या गृहस्थाचा हा २ वर्षाचा बोकड आहे. गेल्यावर्षीच गणेश यांनी या बोकडाचा फोटो आणि व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर लगेचच या बोकडाला पाहण्यासाठी मुस्लिम लोकांनी गर्दी केली. त्याचे कारण पण तसेच आहे. या बोकडाच्या कपाळावर आणि पोटावर चंद्रकोर आहे आणि मुस्लिम बांधवांमध्ये '786' चंद्रकोरीच्या चिन्ह आहे. या चिन्हाला मुस्लिम बांधवांमध्ये खूप मानतात. असे चिन्ह असलेल्या बोकडाची कुर्बानी पवित्र मानली जाते. त्यामुळे या बोकडाला मुस्लिम बांधवांची खूप मागणी आहे. 

काळे बंधूंचे बटवाडी  शिवारात गोट फॉर्म आहे. त्यांच्याच गोट्यात हा २ वर्षांचा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा बोकड आहे, मात्र यावर्षी त्यांनी चाँदला विकण्यास नकार दिला आहे.  हैदराबादमधील एका बकरी व्यापाऱ्याने ह्या बोकडाला खरेदी करण्यासाठी खूप उत्सुकता दाखवली आहे.  

कपाळावरील चंद्रकोर असणारा हा चाँद गणेश यांचे नशीब बदलवेल का? असाच प्रश्न आता निर्माण होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News