महिन्याभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नेमके कोणते खाते दिले जाईल, हे आज किंवा येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

मुंबई : भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक आलेले, जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख असून अवघ्या महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नेमके कोणते खाते दिले जाईल, हे आज किंवा येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी का सोडली? 

गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी, घुसमट, अवमूल्यन होणं हे सातत्याने घडत गेले. आम्ही संयमाने वाट पाहिली की यात काही दुरुस्ती होईल, सुधारणा होईल. पण दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी कार्यकर्त्यांचा संयम किती काळापर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता भुमीका स्पष्ट करा आणि हि भूमिका मला घ्यावी लागली.”, असे कारण जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे असल्याचे सांगितले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News