पावसाला साकडं

दिव्या पाटील
Friday, 5 July 2019

ओलेचिंब करून टाक साऱ्यांना 
छत्री उघडण्यास वेळ देऊ नको... 

खूप झाली प्रतीक्षा आत्ता 
अजून वाट तू लावू नको, 
कंटाळली सर्वच जनता 
आत्ता वेळ तू लावू नकोस... 

रोहिणी गेली न बरसता 
आत्ता कळ तू पाहू नकोस, 
पाण्याचा ठणठनाट सर्वत्र 
आत्ता जाळ तू लावू नको... 

बळीराजा सज्ज आहे पेरण्या 
त्याची सत्वपरीक्षा तू पाहू नकोस, 
शेतात पिकेल तर माणूस जगेल 
तशी वेळ तू कोणावर आणू नको..

साऱ्यांचे मागणे एकच  आहे 
बरस जोरात तू माघे पाहू नको, 
ओलेचिंब करून टाक साऱ्यांना 
छत्री उघडण्यास वेळ देऊ नको... 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News