(VIDEO) 'या' माकडाची हुशारी बघा; मोबाइल चोरत केली ऑनलाईन शॉपिंग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 17 November 2019

माकडाने किरण मालाच्या गोष्टी मागवल्या आहेत.  माकडाने मागवलेल्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या त्यामुळे तिने ऑर्डर कॅन्सल केली नाही.

चीन: एका हुशार माकडाने चक्क ऑनलाईन शॉपिंग केली आहे.  त्याचं काय झालं, चीनच्या Yancheng Wild Animal World प्राणीसंग्रहालयात काम करणारी Lv Mengmeng तिथल्या माकडासाठी जेवण आणायला गेली होती. तिचा मोबाईल ऑफिसमध्येच राहिला होता. परतल्यानंतर जेव्हा तिने आपला मोबाईल पाहिला तेव्हा तिला ऑनलाईन शॉपिंगचा मेसेज दिसला. ही ऑर्डर तिने दिली नव्हती. अशा गोष्टी मागवण्यात आल्या होत्या ज्या तिने ‘शॉपिंग कार्ट’ मध्ये सेव्हही केल्या नव्हत्या. संशय येऊन तिने सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर खरं काय ते समजलं.

 

पाहा खालील व्हिडीओ:

तरुणी जेव्हा परत माकडाच्या पिंजऱ्याजवळ आली तेव्हा तिची नजर तिथे पडलेल्या मोबाईलवर गेली आणि तिला धक्काच बसला. कारण मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग झाल्याचे नोटीफीकेशन झळकत होते. पण ही शॉपिंग कोणी केली असावी हे तिला कळत नव्हते. कारण ज्यावेळी ती बाहेर गेली तेव्हा माकडांशिवाय कोणीही तिच्या आजूबाजूस नव्हते. यामुळे तिने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातील दृश्ये बघून हसावे की रडावे हे तिला कळेनासे झाले. कारण फूटेजमध्ये मोबाईल एका माकडाच्या हातात दिसत होता. एवढेच नव्हे तर माकड मोबाईल स्क्रिनवर टाईप केल्याप्रमाणे बोटांची हालचाल करत असल्याचे तिला दिसले. त्यानंतर सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.

प्राणीसंग्रहालयातल्या एका माकडाचं हे काम होतं. अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात काम करत असल्यामुळे माकडाची आणि तिची चांगलीच ओळख झाली आहे. Lv Mengmeng जागेवर नाही बघून माकडाने मोबाईल घेऊन या भानगडी केल्या. माकडाने किराणा मालाचे साहित्य मागवले होते.  माकडाने मागवलेल्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या त्यामुळे तिने ऑर्डर कॅन्सल केली नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News