चक्क माकडाने प्रियंकाच्या कानशिलात लगावली; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडिया सक्रिय असते.
  • आपल्या खासगी आयुष्याबाबत देखील ती अनेकदा सोशल मीडियावर अपलोड करत असते.

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडिया सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत देखील ती अनेकदा सोशल मीडियावर अपलोड करत असते. असाच एक किस्सा तिने तिच्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. ते ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल.. याशिवाय हसू देखील तुम्हाला आवरणार नाही. 

तर किस्सा असा होता की, प्रियंकाला एका माकडाने कानाखाली मारली होती. त्यावेळी ती शाळेत होती. तिच्या शाळेजवळ बरीच झाडे होती. एक दिवस तिला एका झाडावर माकडीन दिसली जी स्वतःला खाजवत होती. हे पाहून प्रियांका जोराजोरात हसू लागली. 

प्रियंकाला हसताना बघून मात्र माकडीण झाडावरून खाली उतरली आणि तिच्याजवळ गेली. त्यावेळी  माकडिणीने प्रियांकाच्या कानशीलात लगावली आणि पुन्हा झाडावर पळून आली. याबाबत आजही आठवले की, प्रियंकाला हसू आवरत नसल्याचे देखील तिने यावेळी सांगितले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News