चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनाली जाधवचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 22 August 2019

बुलडाणा : चीनमध्ये जाऊन आपल्या बुलडाणासारख्या साधारण आणि गरीब कुटुंबात वाढलेल्या मोनाली जाधवने दोन सुवर्णांसह, तीन पदकांची कमाई करत जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत संपूर्ण जगात महाराष्ट्राची शान वाढवली आहे. यात तिचे तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरीची नोंदही केली आहे.

बुलडाणा : चीनमध्ये जाऊन आपल्या बुलडाणासारख्या साधारण आणि गरीब कुटुंबात वाढलेल्या मोनाली जाधवने दोन सुवर्णांसह, तीन पदकांची कमाई करत जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत संपूर्ण जगात महाराष्ट्राची शान वाढवली आहे. यात तिचे तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरीची नोंदही केली आहे.

चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मोनाली जाधवने विक्रम करत दोन सुवर्णांसह एकूण तीन पदकांची कमाई केली आहे. भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली जाधव ही 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली असून ती बुलडण्यामधील आनंद नगर येथील राहवासी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू असलेली मोनाली जाधव सध्या जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधलं.

या स्पर्धेत मोनाली जाधवने फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळवले. मोनालीने याआधी मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळविले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. तर बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर घरातील कमावता पुरुष गेल्याने सर्व जबादारी आईवर आली. आईला मदत व्हावी आणि मोनालीचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी मोनालीच्या मोठ्या भावाने आपले शिक्षण बंद करून मजुरी करायला सुरुवात केली. आई आणि भाऊ मजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. हे पाहत असताना कुटुंबासाठी आपणही मदत करावी. अशी भावना मोनालीच्या मनात येत होती आणि त्याच वेळी महाराष्ट्र पोलीसची भरती निघाली. खेळात लहानपणापासूनच आवड असल्याने मोनालीने पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पास करून ती बुलडाणा पोलीस शिपाई म्हणून भरती झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News