आई मला शाळेला जायचं... जाऊ देन वं

सुशांत कांबळे
Friday, 16 August 2019

स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या सन्मानाने साजरा केले जातात.स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक व्यक्तींचे स्मरण केले जाते.तसेच दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.

स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या सन्मानाने साजरा केले जातात.स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक व्यक्तींचे स्मरण केले जाते.तसेच दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.

भारतातील सर्व थोरामोठ्यांमध्ये या दिवशी देशभक्तीचे उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळते,अलीकडे तर मालिका, रियालिटी शो इत्यादींमध्ये हे राष्ट्रीय सण गाणी गाऊन, नाट्य रूपांतर करून विशेषरित्या साजरा करत असल्याचे आढळते.सर्वांप्रमाणे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये देखील या दिवसासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची दिसून येते.

शाळेत साजरा होणारे सर्वच उत्सव खास असायचे.आजच्या घडीला शाळेत साजरा केले जाणारे राष्ट्रीय सण आठवले की मन बालपणाच्या आठवणीमध्ये रमून जाते.ते प्रांजळ जुने दिवस आठवले की एका रंजक दुनियेत हरवून गेल्यासारखं वाटतं.शाळेतील स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्रदिन हे दोन्ही दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असायचे कारण हा दिवस साजरा करण्याचे नियोजन जवळ जवळ महिनाभर चालायचे.

सकाळ अधिवेशन असल्याने मला शाळेसाठी रोजच लवकर उठावं लागायचं.इतरवेळी रोज सकाळी लवकर उठावं लागतंय म्हणून आईसोबत जोरदार भांडण करून माझा तीळ-पापड मोडलेला असायचा.पण स्वातंत्र्य आणि गणतंत्र दिवसाचा नित्यकर्म आणि हुरूप काही न्याराच असे. सकळी लवकर उठुन लगबगीने शाळेसाठी तयारी करत असताना कानावर परिसरात लागलेली देशभक्ती पर गीतं ऐकताना कधी एकदाचा बाहेर जाऊन झेंडा वंदनसाठी केलेली तैयारी पाहतोय असं व्हायचं .या दिवशी कडक इस्त्री केलेला गणवेश परिधान करून शाळेकडे कुच करताना मी स्वतः एक नन्हा मुन्हा देश का सीपाही आहे असं वाटायचं.

शाळेत प्रवेश करताच एक दिवस का असेना पण शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहिलेली मुलं पाहून हेवा वाटायचा.परेड सुरू होताच आम्ही पण सैन्य दलातले सैनिक, आहोत असे वाटायचे.पूर्वी शिक्षणात विविध कलांचा अंतर्भाव असायचा.शाळेतला कोणताही कार्यक्रम म्हटलं की तो सांस्कृतिक कार्यक्रमाविना अधुराच असायचा. माझं नेहमीप्रमाणे शाळेत एक तरी देशभक्तीपर गीत, भाषण किंवा नाटक असायचच.या दिवशी शाळेत खाण्यापिण्याची देखील चंगळ असायची दरवर्षी कोणतातरी वेगळा पदार्थ अल्पोपहारात असायचा.आता शाळा संपली,महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले, हुद्दा मिळाला पण या दिवसांची ओढ अजूनही मनात तशीच आहे. काळाच्या ओघात आता सर्वकाही बदलून गेलं आहे. आता देखील या राष्ट्रीय सणांप्रति आदर भाव आणि अभिमान तितकाच आहे फक्त त्यांना साजरा करण्याचे स्वरूप बदलून गेले आहे. आता शाळेतला तो झेंडा वंदन, झेंडा वंदनाची आरास, ती शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहिलेली मुले, शाळेतला तो खाऊ सारं काही दुर्मिळ झालं आहे.

दिवस पालाटले की सवयी सुद्धा बदलतात. आता सर्वांनाच या दिवसाला पिकनिक करता येईल का? ऑनलाईन काही ऑफर आहेत का? शॉपिंग करता येईल का?या दिवशी छान झोप काढता येईल का? यांचे वेध लागलेले दिसून येतात. 

अलीकडच्या मुलांना शाळेत जाऊन कवायत करणं, राष्ट्रध्वजाला सलामी देणं, राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभक्तीपर गीतगायन,नृत्य, अभिनय, पथनाट्य यांसारख्या विविध जनजागृती संबंधित गोष्टी करणं किंवा बघण्याचा देखील भारी कंटाळा येत असल्याचा जाणवतो.येणाऱ्या काळात जर असेच दृश्य राहिले तर आपल्या नवीन पिढीला या राष्ट्रीय सणांचे महत्त्व आणि गोडी तितकी राहणार नाही म्हणूनच प्रत्येक शाळेने किमान या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा सक्तीची करून झेंडा वंदनासाठी का होईना विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची गरज आहे .असे घडले तर आपण आपली भारताची राष्ट्रीय संस्कृतीचे संवर्धन करू शकतो.

मला देखील आज शाळेत जावंसं वाटतंय, पुन्हा त्याच स्फूर्तिदायी नित्यक्रमाचा आनंद घ्यावासा वाटतोय जो आता कामाच्या ओझ्यात कुठेतरी दूर गेला आहे. तुम्हाला माझ्या या विषयातून शाळेतील काही जुन्या आठवणींचा उजाळा नक्कीच झाला असेल, तर मग आणखी कुठल्यातरी मार्गाने विसावण्याचा विचार करण्याऐवजी तुमच्या शाळेला जाऊन एकदातरी नक्की भेट देऊन या, विश्वास ठेवा खरंच खूप आनंद आणि समाधान वाटेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News