"मोदीजी, प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवा"; तरुणाच्या विनंतीला मिळालं  "हे" उत्तर..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • . "मोदीजी, माझ्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवा" अशी कमेंट एकाने केली.
  • या कमेंटला एका भाजप नेत्याने बरोबर उत्तर दिल आहे. 

सध्या सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातच राजकारण्यांच्या फोटो किंवा बातम्यांवर नेटकरी तुटून पडत असतात. सध्या सोशल मीडियावर एका ट्विटची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटवर एका तरुणाने अशीच एक कमेंट केली आहे. त्या कमेंटला उत्तर देखील मिळालं आहे. "मोदीजी, माझ्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवा" अशी कमेंट एकाने केली. या कमेंटला एका भाजप नेत्याने बरोबर उत्तर दिल आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दौऱ्यावर असून ६ जून रोजीचा राजयोगीनी सरला यांच्या निधनासंदर्भात श्रद्धांजली अर्पण करताना एक फोटो ट्विट केला होता. या फोटोवर ज्योयकांती दंडपत नावाच्या एका ट्विटर युझरने कमेंट केली. हा तरुण ओडिशामधील रहिवासी असून प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी त्याने यावेळी केली. ‘या ट्विटला  मोदींनी उत्तर देण्याऐवजी भाजपाचे माजी खासदार आणि प्रवक्ते बैजंत जय पांडा यांनी उत्तर दिले. दरम्यान बैजंत जय पांडा हे स्वत: एक प्रोफेशनल पायलट असून त्यांच्या ट्विटरवरील बायोप्रमाणे त्यांना १ हजार ७७३ तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.

पांडा यांनी उत्तर देताना या तरुणाला प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हेलिकॉप्टरने न जाण्याचा सल्ला दिला. ‘तुम्ही अनेकदा हेलिकॉप्टरची मागणी करणारे ट्विट केली आहे. मात्र तुम्ही लग्नाची मागणी घालण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन जाऊ नये. असे केल्यास ती तुमच्या मागणीला उत्तर देताना इतर गोष्टींने प्रभावित होऊन उत्तर न देता प्रामाणिक उत्तर देईल.’ 

याशिवाय पांडा यांनी या तरुणाची प्रोफाइल पाहून टोमणंही लगावला आहे.  ‘तुमची टाइमलाइन पाहता तुम्ही अनेक अविवाहित तरुणांकडे तुमचे प्रेम व्यक्त केल्याचे दिसत आहे,’ असं म्हटलं आहे. तसेच या तरुणाला पांडा यांनी  ‘जर ती हो बोलली तर मी स्वत: तुला लग्न मंडपामध्ये हेलिकॉप्टरने घेऊन जाईन,’ अशी एक ऑफर देखील दिली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News