#modigoback ट्रेंडने घातला धुमाकूळ

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019
  • ‘मोदी_परत_जा’ हा ‘हॅशटॅग’ पहिल्या पाचांत होता. समाज माध्यमातील या आकस्मिक आक्रमणाने भाजपच्या ‘आयटी सेल’ची मात्र दाणादाण उडाली.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने गती पकडायला सुरूवात केली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत मात्र जोरदार निषेधाने झाल्याचे चित्र आहे. ‘मोदी_परत_जा’ हा ‘हॅशटॅग’ पहिल्या पाचांत होता. समाज माध्यमातील या आकस्मिक आक्रमणाने भाजपच्या ‘आयटी सेल’ची मात्र दाणादाण उडाली.

सध्या भारतीय जनता पक्षाने ‘कलम ३७०’, तोंडी तलाक व राष्ट्रवाद यावरच महाराष्ट्राच्या प्रचाराची धार राहील, याची काळजी घेतली आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ही निवडणूक कलम ३७०च्या भोवतीच केंद्रित होईल, अशी रणनिती आखली आहे. मात्र सोशल मीडियात नेटकऱ्यांनी या प्रचाराचा निषेध करत महाराष्ट्राच्या प्रश्नावर निवडणूक घेण्याची धमक भाजपने दाखवावी, असे आव्हान ‘मोदी_परत_जा’ या ट्रेंडच्या माध्यमातून केले.

‘‘महाराष्ट्रात बेरोजगारीने थैमान घातले आहे. शेतकरी आत्महत्यामध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. पाच वर्षांच्या फडणवीस सरकारच्या कारभारात मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. जलयुक्त शिवारची योजना भ्रष्टाचारात बुडाली आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, या सामाजिक समस्यांवर महाराष्ट्राची निवडणूक व्हायला हवी,’’ अशी विनंती ‘परत जा’ या ट्रेंडखाली नेटकरी करत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News