मोदी लाट गेली आता फक्त राष्ट्रवादीचे वादळ : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 April 2019
  • बाणाचे तुकडे होणार आणि कमळाच्या पाकळ्या पडणार
  • डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुंडेंची आळंदीत सभा

आळंदी - सर्वसामान्य जनतेचा मिळणारा पाठिंबा पाहून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट होती.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वादळ आहे. बाणाचे तुकडे होणार आणि कमळाच्या पाकळ्या पडणार, असा विश्‍वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुंडे यांची आळंदी (ता. खेड) येथे सभा झाली. एकीकडे हुतात्म्यांच्या नावाने मत मागतात आणि दुसरीकडे हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट देतात, अशी टीका मुंडे यांनी भाजपवर केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News