राष्ट्रवादी काँग्रेसचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 18 November 2019

या दोन्ही पक्षांनी संसदीय पक्षांचे अतिशय काटेकोरपणे पालन केले आहे. माझ्यासह इतर पक्षांनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. ते कधीच सभा अध्यक्षांच्या पुढे आले नाहीत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, राज्यसभेत भाषण केले. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. महाराष्ट्रात भाजपला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोडवे गायले आहेत. विशेष म्हणजे राज्यसभेतील आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आज, मी दोन राजकीय पक्षांचे कौतुक करू इच्छितो.

या दोन्ही पक्षांनी संसदीय पक्षांचे अतिशय काटेकोरपणे पालन केले आहे. माझ्यासह इतर पक्षांनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. ते कधीच सभा अध्यक्षांच्या पुढे आले नाहीत. असे करूनही सभागृहात त्यांनी त्यांचे मुद्दे अतिशय व्यवस्थित मांडले. राज्यसभेविषयी बोलताना अनेक बड्या नेत्यांनी या सभागृहात काम केले आहे.  त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक महान व्यक्तींचा समावेश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News