या पक्षाने मुंबईत भ्रष्टाचाराच्या फोटोचं प्रदर्शन भरवलंय

हर्षल भदाणे पाटील
Wednesday, 30 January 2019

हल्ली पुस्तक प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, प्रकल्प प्रदर्शन असे बरेच प्रदर्शनं भरवले जातात. पण  भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरवलेलं कधी ऐकलं आहे का ? नाही ना ? महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं कुठे आणि कसा भ्रष्टाचार झालाय याचे फोटो प्रदर्शन भरवलं आहे. भ्रष्टाचाराचं फोटो प्रदर्शन हे देशातलं पहिलं प्रदर्शन ठरलं आहे. याआधी कधीच कुठे असल्या प्रकारचे प्रदर्शन भरल्याचं ऐकिवात नाही.

हल्ली पुस्तक प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, प्रकल्प प्रदर्शन असे बरेच प्रदर्शनं भरवले जातात. पण  भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरवलेलं कधी ऐकलं आहे का ? नाही ना ? महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं कुठे आणि कसा भ्रष्टाचार झालाय याचे फोटो प्रदर्शन भरवलं आहे. भ्रष्टाचाराचं फोटो प्रदर्शन हे देशातलं पहिलं प्रदर्शन ठरलं आहे. याआधी कधीच कुठे असल्या प्रकारचे प्रदर्शन भरल्याचं ऐकिवात नाही.

अनधिकृत फेरीवाल्यांना  विरोध करत असताना काही दिवसांपूर्वी मनसेचे वॉर्ड अध्यक्ष संतोष धुरी आणि मुंबई मनपाचे वॉर्ड ऑफिसर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्यांनतर संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने मनसेने आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मनसेने फेसबुकवर लाईव्ह करून अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो काढून वॉर्ड ऑफिसरला "वॉर्ड ऑफिसर चोर है" या नावाने टॅग करण्याचे आवाहन केले होते.मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो जमा करुन त्याचे प्रदर्शन मनसेने भरवले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रदर्शन भरवण्यात आले असुन ‘वॉर्ड ऑफिसर चोर आहे’ असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले.

मनसे नेते संदिप देशपांडे यांचे पत्र
जय महाराष्ट्र,
आज हे प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश्य हा आहे की, मुंबईतील पायाभूत प्रश्नांच्यावर वेळोवेळी मनसेने आंदोलने केली आहेत. मग तो फेरीवाल्यांच्या प्रश्न असेल, रस्त्यातील खड्डयांचा असेल, मेट्रो शेडचा असेल, गणेशोत्सव मंडपाचा असेल नाहीतर दहीहंडीचा असेल. वॉर्ड ऑफिसर फेरीवाल्यांच्यावर कारवाई करत नाहीत म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केले. २ महिने संतोष धुरी फेरीवाल्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागे लागले होते. पण अधिकारी दुर्लक्ष करत होते.
संतोष धुरी जाब विचारायला गेले तर जैन हा वॉर्ड ऑफिसर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर धावून गेला.हे अधिकारी आपले जनतेचे नोकर आहेत.

आपल्या पैशातून यांचे पगार होतात. मग हे लोकं त्यांची कर्तव्य का पार पाडत नाहीत? याचा जाब त्यांना विचारायला नको का? एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर कोर्टाने ‘रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या आता कोणत्याही फेरीवाल्यांना बसता येणार नाही’, असा आदेश दिला आहे. पण कोर्टाच्या या आदेशाला या अधिकाऱ्यांनी सरळपणे केराची टोपली दाखवली आहे आणि हे फोटो प्रदर्शन त्याचाच पुरावा आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोशल मिडियावरून जनतेला आवाहन केले होते की, आपापल्या भागातील अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो काढून त्यांनी व्हॉट्सअॅपवर पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हे फोटो पाहून तरी आपल्याला नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची कल्पना येईल अशी आम्हाला आशा आहे.

गेली २५-२८ वर्षे सेना- भाजपाची महापालिकेत सत्ता आहे. हे प्रदर्शन त्यांच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी आम्ही सर्वसामान्य मुंबईकरांच्यासाठी, मराठी माणसांच्यासाठी आंदोलनं करत राहणारच. गरज आहे आम्हाला तुमच्या सहकार्याची. आंदोलनात जनतेचा सहभाग असेल तर ते लवकर यशस्वी होते. आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही आपली ताकत आमच्यापाठी उभी करा. एवढीच तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे.

धन्यवाद
जयहिंद, जय महाराष्ट्र.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News