खड्डयांविरोधात मनसेचं खेकडा आंदोलन, पाहा व्हिडीओ

मिलिंद तांबे
Sunday, 7 July 2019

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून मनसे रस्त्यांवरील खड्डयांविरोधात आक्रमक झाली आहे.कंजूरमार्ग मधील 60 फिट रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेच्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रातर्फे खड्ड्यांत खेकडे सोडुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

कंजूरमार्ग मधील 60 फिट रस्त्याची पावसामुळे अक्षरशा चालणं झाली आहे.मात्र पालिका प्रशासनाचे रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष आहे.याचाच निषेध म्हणून मनसेने हे खेकडा आंदोलन केले.प्रत्येक खेकड्याच्या मागे सरकारमधील मंत्र्यांची नावे लिहून ती खेकडी प्रत्येक खड्ड्यात सोडण्यात आले.

काही दिवसांपूर्वी याच परिसरतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने केक कापून निषेध केला होता.यानंतर पालिकेने तात्काळ त्या रस्त्यावरील खड्डे भरले होते.तीवरे धरण दुर्घटनेनंतर मंत्री तानाजी सावंत यांच्या खेकडा वक्तव्या यानंतर वाद उफाळल्याने याच खेकड्याच्या माध्यमातून आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मनसेचे विक्रोळी विधानसभा अध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News