ईडी प्रकरणात मनसेचा शरद पवारांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019

मनसेनेही आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी सोशल मीडियावर पवारांच्या ईडी चौकशीला विरोध करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांनीही या विरोधात भूमिका मांडली. सरकारक सूडबुद्धीचे राजकारण करत आहे, असा आरोप भाजप सरकारवर केला जात आहे. अशातच मनसेनेही आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी सोशल मीडियावर पवारांच्या ईडी चौकशीला विरोध करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये शरद पवारांचा फोटो व त्यावर 'सूडबुद्धी? मा. शरद पवारांवर कारवाई...' असा मजकूर लिहिला आहे. 'राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारं हे प्रकरण आता सक्तवसूली संचालनालयाने घेतलं असून त्या प्रकरणाची पूर्ण छाननी न करता त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष मा. शरद पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारं हे प्रकरण आता सक्तवसूली संचालनालयाने घेतलं असून त्या प्रकरणाची पूर्ण छाननी न करता त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष मा. शरद पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या ५ वर्षांपासुन भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे व २०११ सालापासून ह्या प्रकरणावर तपास चालू आहे असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे? विरोधीपक्षातले नेते स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि उरलेल्यांना अशा सरकारी तपास यंत्रणांची चौकशी मागे लावायची जेणेकरून विरोधीपक्षचं शिल्लक नाही राहिला पाहिजे असा सरकारचा डाव आहे. अशा प्रकारचा घाणेरडं राजकारण बघून देशात लोकशाही जिवंत आहे कि नाही हा प्रश्न पडतो? बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतमालाचा भाव, निर्यात रोडावणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अडचणीत येणे, थकीत कर्जाचे प्रमाण वाढणे असे अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचते हे लोकशाहीला खूप घातक आहे. #बाळा #नांदगावकर #बाळानांदगावकर #मनसे #bala #nandgaonkar #balanandgaonkar #mns #ncp #sharadpawar #india #maharashtra #pune #mumbai #nashik

A post shared by Bala Nandgaonkar (@bala_nandgaonkar) on

गेल्या 5 वर्षांपासुन भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे व 2011 सालापासून ह्या प्रकरणावर तपास चालू आहे असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे? विरोधीपक्षातले नेते स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि उरलेल्यांना अशा सरकारी तपास यंत्रणांची चौकशी मागे लावायची जेणेकरून विरोधीपक्षचं शिल्लक नाही राहिला पाहिजे असा सरकारचा डाव आहे.

अशा प्रकारचा घाणेरडं राजकारण बघून देशात लोकशाही जिवंत आहे कि नाही हा प्रश्न पडतो? बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतमालाचा भाव, निर्यात रोडावणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अडचणीत येणे, थकीत कर्जाचे प्रमाण वाढणे असे अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचते हे लोकशाहीला खूप घातक आहे.' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने काही दिवसांपूर्वी कोहिनूर मील प्रकरणी चौकशी केली होती. त्यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचीही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीसीठी राज यांना दिवसभर ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आले होते.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News