बच्चू कडूंचा 'हा' TikTok व्हिडीओ व्हायरल; पहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनामुळे परिचीत आहेत, तसेच ते त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. बच्चू कडू हे अनेकदा कबड्डीच्या मैदानात पाहायला मिळाले. सध्या बच्चू कडूंचा कबड्डीच्या मैदानातील एक TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अमरावती : अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनामुळे परिचीत आहेत, तसेच ते त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. बच्चू कडू हे अनेकदा कबड्डीच्या मैदानात पाहायला मिळाले. सध्या बच्चू कडूंचा कबड्डीच्या मैदानातील एक TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे. या टिक टॉक व्हिडीओमध्ये बच्चू कडून कबड्डीची रेड करताना पाहायला मिळतात. एखाद्या कुशल खेळाडूप्रमाणे बच्चू कडूंनी आपलं कबड्डीचं कौशल्य दाखवलं असून बच्चू कडूंचा हा व्हिडीओ लाईक मिळवत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमरावतीत कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही बच्चू कडू यांनी आपलं कबड्डीचं कौशल्य दाखवलं होतं. मात्र सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो नेमका कोणत्या स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा आहे, हे समजू शकलेलं नाही.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News