आमदार आकाश फुंडकर यांची विधिमंडळ प्रतोद म्हणून निवड

श्रीधर ढगे
Tuesday, 18 June 2019

खामगाव : दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड आकाश फुंडकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजप विधिमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानमंडळ मध्ये भाजप पक्षाचे वतीने कोणत्याही विषयात सरकारची बाजू मांडणे, भाजप च्या सर्व आमदारांना व्हीप जारी करणे, सरकारची बाजू अधिकृतपणे मीडिया व इतर माध्यमांसमोर मांडणे आदी महत्वाचे अधिकार आमदार आकाश फुंडकर यांना मिळणार आहेत.

महाराष्ट्र भाजपात टीम देवेंद्र फडणवीस मध्ये युवा आमदार  आकाश फुंडकर फुंडकर  हे एक नाव आहे. त्यांचे वडील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरयांचे एक वर्ष आधी निधन झाले. भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर हे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या फळीतील भाजपाचे जेष्ठ नेते होते. त्याच्या नंतर आता आमदार ऍड. आकाश फुंडकर हे राजकीय वारसा चालवित आहे. दरम्यान आकाश फुंडकर यांची विधिमंडळ प्रतोद पदी निवड करण्यात आली. सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा असतो. त्यामुळे आमदार आकाश फुंडकर याची निवड महत्त्वाची मानल्या जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News