मिक्स व्हेजचा कोरमा असा बनवा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

साहित्य 

साहित्य 

  • अर्धी वाटी फ्लॉवर चे तुरे
  • अर्धी वाटी मटार दाणे किंवा मक्याचे दाणे
  • दोन मध्यम बटाटे नेहेमी प्रमाणे काचर्‍या करून पाण्यात घालून ठेवणे. सालासकटही वापरले तरी चालतील
  • एक मध्यम मोठा कांदा, नेहेमीप्रमाणे चौकोनी चिरून
  • दोन मध्यम सिमला मिरच्या, चौकोनी चिरून
  • दोन मध्यम टोमॅटो, चौकोनी चिरून
  • अर्धी वाटी पनीर चे क्यूब्स (लहान लहानच हवेत) हे ऑप्शनल आहेत; शक्यतो मी वापरत नाही
  • अर्धी वाटी गाजराचे लहान लहान क्यूब्स
  • पाव चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला
  • १ टीस्पून जिरा पावडर आणि १ टीस्पून धणा पावडर
  • १ टीस्पून लाल तिखट
  • पाव टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल, चिमूटभरच जिरं

कृती

  1. ही भाजी लोखंडी कढईत मस्त होते; सो लोखंडी कढई सणसणून तापवावी. जरा जास्तच तेल घेऊन चिमूटभर जिरं घालून फोडणी करावी आणि त्यात कांदा घालावा.
  2. कांदा जरा गुलबट - पारदर्षक झाला की टोमॅटो घालून मसाला पूर्ण गळू द्यावा.
  3.  मसाल्याला चांगलं तेल सुटलं की सगळे कोरडे मसाले आणि चिरून ठेवलेल्या भाज्या, मटार /मका दाणे इ. घालाव्यात आणि ३ - ४ मिनिटं मोठ्याच आचेवर परतत राहावं.
  4. आता यात पाव वाटी पाणी घालून मंद आचेवर झाकण घालून भाजी शिजू द्यावी. नंतर मीठ आणि गरम मसाला घालून नीट हलवून घ्यावी.
  5. गरम गरम भाजी तेल/तूप लावलेल्या गरमच फुलक्यांबरोबर किंवा तव्यावरून ताटात अश्या पराठ्यांसोबत खावी. नाश्त्याला किंवा ब्रंचला म्हणून मस्त प्रकार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News