तापसी साकारणार मितालीचा रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • मितालीच्या या बायोपिकसाठी अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावाची वर्णी लागली आहे.
  • मितालीच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये तिचा क्रिकेटपटू म्हणून सुरू झालेला प्रवास, तिचं बालपण दाखवण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध खेळाडूंचे बायोपिक बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सायना नेहवाल, कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनत असताना महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकची चर्चा सुरू झाली आहे.

मितालीच्या या बायोपिकसाठी अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावाची वर्णी लागली आहे. मितालीच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये तिचा क्रिकेटपटू म्हणून सुरू झालेला प्रवास, तिचं बालपण दाखवण्यात येणार आहे.

याआधी तापसीने ‘सुरमा’ चित्रपटात हॉकीपटूची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तिच्या पदरी खेळाडूची भूमिका आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News