एमआयटीचे देशात आऊटलुकच्या गुणवत्ता यादीत 14 वे स्थान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • देशातील अभियांत्रिकी आणि आर्किटेक्‍चर महाविद्यालयांची रॅंकिंग आऊटलूक मासिकाने प्रकाशित केली आहे. 
  • महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून शैक्षणिक मूल्यमापनात एमआयटी पॉलीटेक्‍नीकला सर्वोत्कृष्ट ग्रेड मिळालेला आहे.

औरंगाबाद: देशातील अभियांत्रिकी आणि आर्किटेक्‍चर महाविद्यालयांची रॅंकिंग आऊटलूक मासिकाने प्रकाशित केली आहे. देशातील आर्किटेक्‍चर महाविद्यालय सर्वेक्षणमध्ये एमआयटी आर्किटेक्‍चर चा देशात 14 वा तर, महाराष्ट्रात दुसरे स्थान पटकावले आहे. 

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून शैक्षणिक मूल्यमापनात एमआयटी पॉलीटेक्‍नीकला सर्वोत्कृष्ट ग्रेड मिळालेला आहे. एआयसीटीई-सीआयआय सर्वेक्षणचा गोल्ड रॅंक मिळाला आहे. या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे औद्योगिक प्रशिक्षण, इंडस्ट्री-फॅकल्टी सुसंवाद, उद्योग समूहाद्वारे उभारलेल्या अद्ययावत प्रयोगशाळा व इतर सुविधा, उद्योग क्षेत्रातील संशोधन व विकास, प्लेसमेंट याआधारे रॅंक देण्यात येतो. 

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वेक्षणात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचा देश पातळीवर 87 वा, महाराष्ट्रात 13 वा तर, मराठवाड्यात पहिली रॅंक आहे. तर मराठवाडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीचा देशात 93 वा, महाराष्ट्रात 14 वा तर, मराठवाड्यात दुसरा रॅंक आहे. प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सर्वोत्कृष्टता, व्यक्तिमत्व विकास आणि औद्योगिक सुसंवाद, पायाभूत सुविधा, आणि प्लेसमेंट या पाच मापदंडानी आऊटलूक सर्वेक्षण करण्यात आले. 

देशातील अभियांत्रिकी रॅंकिंगमध्ये एमआयटी समूहाच्या संस्थांनी स्थान मिळविले आहे. प्राध्यापक, कर्मचारी, कॅम्पस विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी, व्यवस्थापन यांचे टीमवर्क आणि शेकडो कंपन्यांचे एमआयटी समूहाला मिळालेले शैक्षणिक मार्गदर्शन यांच्यामुळे हे सर्व शक्‍य झाले. असे मत प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी मांडले. एमआयटी समूहाचे महासंचालक मुनीष शर्मा यांनी डॉ. भोसले, डॉ. निलेश पाटील, प्रा. सुनील देशमुख, आर्किटेक्‍चर विभाग प्रमुख प्रा. कुलदीप कौर भाटिया यांचे अभिनंदन केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News