'मिशन मंगल'चा दुसरा ट्रेरल रिलीज

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

अक्षय कुमारच्या आगामी 'मिशन मंगल' चित्रपटाचा काही दिवसांपुर्वी पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुंबई : अक्षय कुमारच्या आगामी 'मिशन मंगल' चित्रपटाचा काही दिवसांपुर्वी पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्रोकडून लाँच करण्यात आलेल्या मंगळयानावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताचं सोशल मीडियावर प्रचंड व्हायर झाला आहे. 

अक्षयनं ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ' सात वेळा खाली पडा...पण आठव्यांदा उठा! ही गोष्ट आहे कधी न हार मानन्याची' अशा कॅप्शनसहीत त्यांनं हा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार सोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ती कुल्हाडी आणि शर्मन जोशी अशी तगडी स्टार कास्ट असलेले कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. येत्या 15 ऑग्स्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News