‘मिशन मंगल’ हा चित्रपट मोहिमेच्या सत्य कथेवर आधारित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

मल्टिस्टारर ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेच्या सत्य कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

मल्टिस्टारर ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेच्या सत्य कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

जवळपास या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये भारताच्या मंगळ मोहिमेची सुरुवात ते ही मोहीम भारताने कशाप्रकारे यशस्वी केली याची झलक पाहायला मिळतेय.

अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शर्मन जोशी हे कलाकार या ट्रेलरमध्ये दिसताहेत. राकेश धवन हे पात्र अक्षय साकारत आहे, जो या मंगळ मोहिमेचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News