‘झी’वर ‘मिसेस मुख्यमंत्री’  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

‘झी मराठी’ वाहिनीची एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीची एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असणार किंवा या मालिकेत कोण दिसणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

पण सध्या या मालिकेच्या नावावरून प्रेक्षकांमध्ये बऱ्याच चर्चा होत आहेत. या मालिकेचे नाव जरी ‘मिसेस मुख्यमंत्री’ असले तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीवर किंवा कोणत्याही राजकीय घटनेवर आधारित नाही. आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर ‘झी मराठी’ वाहिनीवरील कोणती मालिका बंद होणार, याचीही उत्सुकता आहेच.
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News